पर्वतीमधील विजयाची चिंता नाही : पंकजा मुंडे 

माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ सभा

पर्वती  – पुणे शहर आणि जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत आमदार म्हणून माधुरी मिसाळ यांनी केलेल्या विकासकामांची यादी तसेच त्यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद पाहता शहरातील उमेदवारांच्या विजयासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मिसाळ यांच्या विजयाची कोणतीही चिंता नाही, असा विश्‍वास महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक रघुनाथ गौडा, बाळा ओसवाल, बाबुराव घाटगे, स्वरदा बापट, हरीश परदेशी, यांच्यासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

मिसाळ यांच्या प्रचारासाठी वाळवेकर लॉन्स येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत मुंडे यांनी केले. यावेळी मिसाळ यांनी आपल्या कर्तव्यपूर्ती अहवालाचे सादरीकरण केले.

मुंडे म्हणाल्या, शहर आणि जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. त्यामुळे यशाबद्दल कोणतीही चिंता वाटत नाही. निवडणूक म्हटले, की विविध प्रकारच्या अफवा पसरत असतात. पण, त्यावर कोणताही विश्‍वास न ठेवता कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे. त्यामुळे विजयश्री खेचून आणणे अवघड होणार नाही. आजची सभा ही प्रचाराची नाही, तर विजयाची सभा झाली पाहिजे. असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी आवास योजना, स्वच्छतागृहांची सुविधा, तर राज्य शासनाने महिलांसाठी योजना राबवल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सभेपूर्वी कार्यकर्त्यांनी मतदारसंघात प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. दीपक मिसाळ, नगरसेवक धीरज घाटे, बाळा ओसवाल, नगरसेविका स्मिता वस्ते, शिवसेनेचे माजी गटनेते अशोक हरणावळ आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)