मुंबई – ‘जेम्स बॉन्ड’चा एक मोठा चाहता वर्ग आहे. आता लवकरच जेम्स बॉन्ड सीरिजचा 25वा “नो टाइम टू डाय” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित झाला. 10 भाषांमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘नो टाइम टू डाय’ चित्रपटाचा ट्रेलर हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम इत्यादी. भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, याच पार्शवभूमीवर या चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर या मराठमोळ्या ‘जेम्स बॉन्ड’ला जोरदार पसंती मिळत आहे. 2 एप्रिल 2020रोजी हा चित्रपटात घराघरात रिलीज होणार आहे.
#NoTimeToDie trailer drops tomorrow in *10* languages: #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada, #Gujarati, #Marathi, #Punjabi, #Bhojpuri, #Bengali, #Malayalam… 2 April 2020 release in *5* languages: #English, #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada. #JamesBond007 #Bond25 #BondJamesBond pic.twitter.com/MWB3vwdHye
— taran adarsh (@taran_adarsh) February 27, 2020
चित्रपटात 51 वर्षांचा हॉलिवुड अभिनेता ‘डेनियल क्रेग’ हा सर्वात जास्त काळ बॉन्डची भूमिका साकारत आहे. डेनियल क्रेगने या आगोदर ‘कसिनो रॉयल्स’ (2006), ‘क्वान्टम ऑफ सोलास’ (2008), ‘स्कायफॉल’ (2012) आणि ‘स्पेक्टर'(2015) या चित्रपटांमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती.