…म्हणून पुणे-मुंबई-दिल्लीमध्ये करोनाची तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितले कारण

नवी दिल्ली – देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वाधिक बसला आहे. ही लाट ओसरत जात आहे. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली. असे असताना तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. याआधीच्या लाटेमध्ये मुंबई, पुणे सारख्या शहरांना सर्वाधिक फटला बसला आहे. अशा शहरांना आता तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अर्थातच या शहरांना सतर्क रहावे लागणार आहे. एनटीएजीआय कोविड -19 च्या कार्यकारी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के अरोरा यांनी नुकतीच आऊटलूकला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे.

डॉ. एन. के अरोरा म्हणाले की, तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण फक्त एक टक्के आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवला होता. या शहरात करोनाचा प्रादुर्भाव इतका होता की तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे.

“देशात सध्या असलेल्या कोरोना स्ट्रेनने अनेकांना संक्रमित कें आहे. या सर्वांमध्ये एन्टिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी जाणवतोय. जोपर्यंत कोरोना स्ट्रेनमध्ये कोणताही मोठा बदल होत नाही, अथवा कोरोनाचा नवीन स्ट्रेन येत नाही, तोपर्यंत कोरोनाची तिसरी येण्याची शक्यता नाही.” असे प्रसिद्ध महामारी तज्ज्ञ डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाल्या आहेत.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय रॉय या बोलताना म्हणाले की, ‘कोणत्याही लाटेमध्ये अतिसंवेदनशील होस्ट, विषाणू आणि वातावरण या तीन गोष्टी महत्वाच्या असतात.’ विषाणूनं आपलं रुप बदललं तसेच लोकांनी नियमांचं पालन न केल्यामुळे दुसरी लाट आली.

एका संशोधनानुसार राजधानी दिल्लीमधील जवळपास 70 टक्के लोक याआधी कोरोना संक्रमित झालेले आहेत. ही संख्या जास्तही असू शकते. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू म्युटेट झाल्याशिवाय अथवा नवीन स्ट्रेन आल्याशिवाय तिसऱ्या लाटेची शक्यता नाही, असे रॉय म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्या शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. अशा शहरांना आता करोनाचा धोका कमी असल्याचे जानकारांकडून सांगण्यात येत आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरत करोनाचे सर्वाधिक रुग्ण दुसऱ्या लाटेमध्ये मिळाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.