नवी दिल्ली: दिल्लीतील वायू प्रदूषणाबाबत खासदार आणि उच्च अधिकाऱ्यांचे मोठे दुर्लक्ष समोर आले आहे. नगरविकास मंत्रालयावरील संसदीय स्थायी समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणाच्या मुद्यावर चर्चा होणार होती, परंतु सदर बैठक तहकूब करण्यात आली.
याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, या बैठकीत बरेच खासदार आणि अधिकारी पोहोचलेच नाहीत. खासदार जगदंबिका पाल हे संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत केवळ चार खासदार पोहोचले. ज्यात अध्यक्ष जगदंबिका पाल, हसनैन मसूदी, सीआर पाटील आणि संजय सिंह यांचा समावेश आहे.
दिल्लीचे तीन एमसीडी आयुक्तही या सभेला पोहचू शकले नाहीत, ही बैठक आज सकाळी 11:00 वाजता संसदेच्या अॅनेक्समध्ये होणार होती. परंतु स्थायी समितीचे सदस्य असलेल्या हेमा मालिनी आणि गौतम गंभीर या बैठकीस अनुपस्थित होते. गौतम गंभीर सध्या इंदूर येथे सुरू असलेल्या बांगलादेश कसोटी सामन्याचे समालोचन करीत आहेत. गौतम गंभीर पूर्व दिल्लीतील लोकसभेचे खासदार देखील आहेत.
दरम्यान, नेटकाऱ्यानी गौतम गंभीर’ला चांगलेच ट्रोल केले आहे. त्यामुळे ट्विटरवर गौतम गंभीर भारतात ट्रेडिंगवर आहे. #ShameOnGautamGambhir असे लिहून दिल्लीतील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यावर गौतम गंभीर याने देखील स्पष्टीकरण दिले आहे. मला शिवीगाड करून जर दिल्लीतील प्रदूषण कमी होत असेल. तर मला मनभरून शिव्या द्या, असे गंभीर म्हणाला.