“कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही”

नवी दिल्ली, दि. 13 – कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होण्याच्या वाटेवर नाही असे आज प्रसारभारतीने स्पष्ट केले. रेडीओ स्टेशन्स बंद होणार असल्याचे चुकीचे वार्तांकन तसेच खोट्या बातम्यांची गांभीर्याने दखल घेत प्रसारभारतीने या सर्व बातम्या निराधार आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोणतीही राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही रेडिओ स्थानकाची श्रेणी कमी करण्यात आलेली नाही वा बदललेली नाही असे प्रसारभारतीने पुढे नमूद केले आहे. वरील सर्व स्थानकांवर होत असलेले स्थानिक कार्यक्रम त्यांच्या भाषिक सामाजिक संस्कृती आणि लोकसंख्येच्या वैविध्यतेची पूर्ण नोंद घेत स्थानिक प्रतिभेला वाव देण्याचे आकाशवाणीचे धोरण अनुसरत सुरू राहतील. आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, नेटवर्क यांना बळकटी आणण्याच्या योजनेसह अनेक महत्त्वांच्या योजना 2021-2022 मध्ये प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीसह आपण वाटचाल करत आहोत, असे प्रसारभारतीने जाहीर केले आहे. याशिवाय देशभरात हे जाळे, शंभराहून अधिक नवीन एफ एम रेडिओ ट्रान्समीटरसह विस्तारण्याचीही योजना आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.