अंगणवाडीच्या शौचालयात अन्न शिजवण्यास अडचण नाही; बालविकास मंत्री 

नवी दिल्ली – अंगणवाडी केंद्रात मुलांना शिक्षणांसोबतच पोषण आहारही दिला जातो. परंतु, अनेकवेळा पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. तसेच पोषण आहार बनविण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेण्यात आलेले आहेत. मात्र, यानंतरही पोषण आहारात कोणताच बदल केला जात नाही. आता एका महिला आणि बालविकास मंत्र्यांनी धक्कादायक विधान केले आहे.

मध्यप्रदेशच्या महिला आणि बालविकास मंत्री इमारती देवी यांनी म्हंटले कि, अंगणवाडीच्या शौचालयात अन्न शिजवण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. परंतु, शौचालय आणि स्वयंपाक गॅसमध्ये केवळ एक भिंत असली पाहिजे, असे विधान त्यांनी केले आहे.

दरम्यान, शिवरपुरीच्या एका अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहाचा उपयोग मुलांच्या आहारासाठी केला जातो. यावर इमारती देवी यांनी उपाय सुचवण्याऐवजी यामध्ये कोणतीच अडचण नसल्याचे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)