मल्टि टेक ई-मोटर्स दालनाचे दिमाखात उद्घाटन
आळंदी (वार्ताहर) –आळंदीत सचिन थोरवे यांच्या मल्टि टेक ई-मोटार्स (इलक्ट्रिक बाईक) दालनाचे (शोरुम) आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते प्रजासत्तादिनानिमित्त उद्घाटन करण्यात आले. या इलक्ट्रिक बाईकमुळे आळंदीतील प्रदूषण रोखण्यास हातभार लागणार असून आळंदीकरांसह भाविकांना शुद्ध हवा मिळणार असल्याचे गौरवोद्गार आमदार दिलीप मोहिते यांनी काढले
यावेळी हभप डॉ. नारायण महाराज जाधव, खरेदी-विक्री संघाचे राजाराम लोखंडे, कैलास थोरवे, उद्योजक संतोष खोल्लम, मल्टी टेक ई मोटर्सचे सर्वेसर्वा सचिन थोरवे, शिवाजी पगडे, किरण येळवंडे, शामराव गिलबिले, भगवान लेंघडर, महादेव पाखरे उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, प्रदूषणामुळे जगासह पृथ्वीचे संतुलन बिघडले आहे. जगातील चार-पाच राष्ट्र वगळली, तर चीन, भारताने देखील प्रदूषणाची पातळी आता ओलांडली आहे. भारतातील सर्व नद्या त्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत, जर आताच मानवाने पाऊले उचलली तर पुढील पिढीला पाणी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदूषण टाळण्यासाठी इलक्ट्रिक बाईकचा वापर करा तसेच जास्तीत जास्त झाडे लावावीत, प्लॅस्टिकचा वापर टाळा असे आवाहन त्यांनी केले.
15 रुपयांत धावणार 100 किमी
या इलक्ट्रिक बाईकला पेट्रोल लागत नाही, आवाज नाही, किक नाही, गिअर नाही, शिवाय 15 रुपयांत 100 किमी ही बाईक धावणार आहे. अशा या इलक्ट्रिक बाईकचे दालन आळंदी-मरकळ रस्त्यावर प्रजासत्ताक दिनाच्या मुहहूर्तावर सुरू केल्याने थोरवे परिवाराने खऱ्या अर्थाने आता प्रदूषणाला आळा घालण्याचे काम केले, असल्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.