नो पार्किंग, नो एंट्रीबाबत बदल

पुणे – वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या काही भागांमध्ये वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंग, नो हॉल्टिंग, नो एंट्रीबाबत बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेने गुरुवारी परिपत्रक काढले असून हरकती व सूचना मागविल्या आहेत. आलेल्या सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

चतुःशृंगी परिसरातील स्मित हौसिंग सोसायटी ते दिप बंगला चौक आणि महर्षी वाल्मिकी चौक ते स्मित हौसिंग सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्व वाहनांना “नो-एंट्री’ केली आहे. तर, भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या एम्पायर बिल्डींगपासून ते सावंत विहार सोसायटी गणपती मंदिरपर्यत सम-विषम पार्किंग केले आहे. तसेच, मुंढव्यातील एबीसी चौक ते ताडीगुत्ता चौकादरम्यान दोन्ही बाजूस नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.