कोणालाही यश सहजपणे मिळत नाही – सोनम कपूर

“रांजणा’ आणि “नीरजा’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांमधून बॉलीवूडमध्ये आपली ओळख प्रस्थापित करणारी सोनम कपूर स्ट्रगल करण्याला सर्वाधिक महत्त्व देते आहे. कोणालाही स्ट्रगल केल्याशिवाय यश सहजासहजी मिळत नाही, असे तिने संगितले. यश मिळण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली सोनम अजूनही आपला स्ट्रगल संपला नाही असेच मानते. या पंधरा वर्षांचा प्रवास सहजसोपा नव्हता. काही गोष्टी सहजपणे मिळत नाहीत, हे लक्षात घेण्यासाठी स्ट्रगल करावा लागला असून ते खूप कठीण होते. जर सहजासहजी यश मिळते तर सहजासहजी निघूनही जाते. त्यामुळे कष्टाने मिळवलेले यश दीर्घकाळ टिकते आणि त्यावरच आपला विश्‍वास असल्याचे सोनमने सांगितले.

सोनमने आतापर्यंतचे जेवढे रोल केले आहेत, त्यासाठी तिला खूप कष्ट घ्यायला लागले. खूप अभ्यासही करायला लागला. त्याला कोणताही पर्याय नव्हता. हे कष्टच आपल्याला चांगले यश मिळवून देतील, याचा तिला विश्‍वास आहे.

आपल्याला जीवनभर फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकाव धरून राहायचे आहे याची तिला चांगली कल्पना आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत आपल्याला काम करायचे आहे. हे तिने स्वतःला बजावले आहे. त्यामुळे स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही फंडा तिने कधीच अवलंबलेला नाही.

महिलांच्या दृष्टिकोनातील चित्रपटांमध्ये काम करायला जास्त आनंद वाटतो, असेही तिला सांगितले. अलीकडच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणारा बदल खूपच सावकाश होतो आहे. कोणताही बदल हा नेहमीच स्वागत करण्यास योग्य असतो. त्यामुळे सर्व बदलांना सामोरं जायची तिची तयारी आहे. “जोया फॅक्‍टर’ हा अलीकडेच रिलीज झालेला तिचा सिनेमा आहे. त्यात दुलकर सलमान तिच्याबरोबर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.