मुंबई – MeToo मोहिमेअंतर्गंत प्रकाश झोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री ‘तनुश्री दत्ता’ने पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला आहे. “कोणाची रात्र सजवून मी अभिनेत्री झाले नाही” असं वादग्रस्त वक्तव्य तिने केलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री बोलत होती. यावेळी तिने MeToo मोहीम, स्त्रीवाद याविषयी चर्चा केली.
वर्ष 2008 मध्ये “हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार तनुश्रीने तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजे, ऑक्टोबर 2018 मध्ये दाखल केली होती. त्यादरम्यानच अशा लैंगिक शोषणाविरोधात ‘#MeToo’ हे अभियान समाज माध्यमांतून चांगलेच गाजले होते. यावेळी अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती.