ब्रेक्‍झिटबाबत नव्याने वाटाघाटी नको

युरोपिय युनियनचा इशारा

ब्रुसेल्स – युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनने पूर्वी दिलेल्या वचनबद्धतेबाबत नव्याने कोणत्याही वाटाघाटी करण्यात येऊ नये, असा इशारा युरोपीय संघाच्यावतीने देण्यात आला आहे. ‘ब्रेक्‍झिट’ पश्‍चातच्या स्थितीसंदर्भात लंडनमध्ये होत असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत विश्‍वास धूसर होत असल्याची लक्षणे दिसायला लागल्यावर युरोपीय संघाने ब्रिटन सरकारला हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

ब्रिटन सरकारकडून जर आपला शब्द पाळला गेला नाही, तर व्यापार विषयक भविष्यातील तरतूदी आणि आयर्लंडसंदर्भातील शांतता प्रक्रियेबाबत मोठ्या मुश्‍कीलीने निश्‍चित केलेला तोडगा निरर्थक जाऊ शकतो, असेही युरोपीय संघाने म्हटले आहे. 

ब्रिटनमधील बोरीस जोन्सन यांच्या सरकारने ‘ब्रेक्‍झिट’ची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी आणि 31 जानेवारी रोजी युरोपीय संघातून ब्रिटनला बाहेर पडण्याची प्रक्रिया पार पाडावी, अशी आपल्याला आशा असल्याचे युरोपियन युनियनचे कार्यकारी कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेन यांनी सांगितले.

रविवारच्या चर्चेच्या फेरीदरम्यान सकारात्मक निष्कर्श न निघाल्यावर बोरीस जोन्सन यांनी 15 ऑक्‍टोबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास ब्रिटन कोणतीही वाटाघाटी न करता सद्यस्थितीबाबत फेरविचार करेल, असे सूचक वक्‍तव्य केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.