पुणे : व्यापारासाठी पी1 आणि पी2 योजना पुन्हा राबवू नये. पुन्हा लॉकडाऊन जाहिर करू नये, या मागणीचे निवेदन मुख्यंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना देण्यात आले आहे.
असा कोणताही निर्णय घेतल्यास महासंघाशी सलग्न 82 संघटनाचे 30 हजार व्यापारी तीव्र विरोध करतील, असे या निवेदनात म्हटाले आहे. अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांची या निवेदनावर सही आहे.