सुपरओव्हरची गरज नाही – रॉस टेलर

वेलिंग्टन –आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुपरओव्हरचा अवलंब केला जाऊ नये, असे स्पष्ट मत न्युझीलंडचा कसोटी क्रिकेटपटू रॉस टेलर याने व्यक्त केले आहे.

जर अशा स्पर्धांमधील अंतिम लढतीत दोन्ही संघांची बरोबरी झाली तर विजेतेपद विभागून दिले जावे, अशी मागणीही त्याने केली. गेल्या वर्षी झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंड संघाला सुपरओव्हर देखील बरोबरीत सुटल्याने सर्वाधिक चौकारांच्या जोरावर विजेता ठरवण्यात आले व न्यूझीलंडला याच नियमांचा फटका बसल्याने विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न पूर्णहोऊ शकले नाही. त्यामुळे आयसीसीने मोठ्या स्पर्धांमध्ये सुपरओव्हरचा अवलंब अंतिम सामन्यात केला जाऊ नये, असेही त्याने व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.