लसीकरणाबाबत आता लबाडी, खोटेपणा नको : राहुल गांधी

नवी दिल्ली – देशाचे वेगवान पद्धतीचे लसीकरण गरजेचे असून संपूर्ण देशाचे लसीकरण शक्‍य तितक्‍या लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे, या बाबतीत लोकांना आता भाजपचे खोटे दावे, भंपक घोषणा आणि अन्य लांड्यालबाड्या नको आहेत असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या निष्काळजीपणाने देशात लसींची टंचाई निर्माण झाली. त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र भरकटण्यासाठी भंपक घोषणाबाजीही देशात झाली होती. आता असले प्रकार होता कामा नयेत असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांची खोटी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून वारंवार केला जात आहे; पण याच नादात करोनाचा मोठा प्रादुर्भाव देशात निर्माण झाला आणि असंख्य लोकांचे यात प्राण गेले असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने कोविशिल्ड डोसमधील अंतर स्वत:च्या मनानेच वाढवले असल्याची एक बातमी प्रसारित झाली आहे त्याचा दाखलाहीं राहुल गांधी यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटवर दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.