नवी दिल्ली – शिवसेनेचा शिंदे गट आज (शुक्रवार) निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. त्या भेटीवेळी पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला जाणार आहे. शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट पक्षावर दावा सांगत आहेत. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे.
यावरून आता राष्ट्रवादीचे, विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते ते म्हणाले,’काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले,’धनुष्यबाण या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार होता, आहे आणि राहील. जरी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या असतील आणि निकाल दिला नसेल. तरी आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरेंकडे चिन्ह राहील. न्यायालय त्यावर निकाल देईल.’ असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट आपला उमेदवार देणार आहे. शिंदे गट ती पोटनिवडणूक लढवणार नाही. त्या गटाचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असेल, पण पोटनिवडणूक विचारात घेऊन शिंदे गट निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे. त्यामागे ठाकरे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये अशी खेळी असल्याचे मानले जाते.