पुणे – कसबा विधानसभा पोटनिवडणूक- या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना काल उमेदवारी जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले. मात्र मागील 40 वर्षापासून कसबा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर हे देखील उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही, नाराज असलेले दाभेकर आज बंडखोर म्हणून पोट निवडणूक लढवत आहेत. काही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही असे दाभेकरांनी स्पष्टपणे सांगितले.
पक्षाचा मी गेले 40 वर्ष कार्यकर्ता आहे 40 वर्षात काँग्रेसमध्ये सेवा केल्यानंतर मला काय मिळालं हा प्रश्न उपस्थित होतो काही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही कोणत्याही वरिष्ठ नेत्याने माझ्याशी संपर्क साधला नाही, असेही त्यांनी यावेळेस बोलून दाखविले.