‘मास्क नाही प्रवेश नाही’ कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम राज्यभर राबवायला हवा-मुख्यमंत्री

Madhuvan

 

कोल्हापूर /प्रतिनिधी- माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला.

पुणे महसूल विभागातील जिल्ह्यां शी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यामंत्री तथा पुणे जिल्ह्या चे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्ह्याेचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्ह्या चे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हा्पूर जिल्ह्यारचे पालकमंत्री तथा गृहराज्यतमंत्री सतेज पाटील, सोलापूर जिल्ह्या चे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याासह संबंधित जिल्ह्याचे पालकसचिव सहभागी झाले होते.
कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. उज्ज्वला माने, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा. ही मोहीम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्य संपन्न व्हावा यासाठी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचे आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम राज्यभर न्ह्यायला हवा.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, काही लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग वाढत आहे. यासाठी गृह विलगीकरण आणि गृह अलगीकरणातील बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून नागरिकांच्या तपासणीबरोबरच त्यांना आरोग्य शिक्षण मिळणे गरजचे आहे. निरोगी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सक्रीय व्हावे. जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांना दंडात्मक कारवाईही करावी, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांना लागणारा आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाने टँकर उपलब्ध करुन द्यावेत. कोल्हापूर जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. घरोघरी आरोग्य पथकामार्फत नागरिकांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेतून इली व सारीच्या रुग्णांची माहितीही संकलित केली जात आहे. जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून सुमारे एक कोटीचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या नजिकच्या जिल्ह्यासह सीमा भागातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे फिजिशिएन उपलब्ध व्हावेत. एनआयव्ही, एचएफएन खाटांची क्षमता वाढवून ठेवावी लागेल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून आवश्यक असणारा एसडीआरएफमधील निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकानदार या ठिकाणी मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये प्रबोधनाचे होर्डिग्ज लावत आहेत. दुकानदार दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात फलक लावत आहेत. पब्लिक ॲड्रेस यंत्रणा, घंटा गाडी यावरुनही मोठ्या प्रमाणात मोहिमेची प्रचार प्रसिध्दी केली जात आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी विना मास्क खरेदी करु नये तसेच संबंधित दुकानदारानेही मास्क् न लावल्यास त्याच्याकडूनही ग्राहकांनी खरेदी करु नये यासाठी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही असे फलक दुकानदार दर्शनी बाजूस स्वत:हून लावत आहेत. त्याचबरोबर दुकानदाराने मास्क लावला नसेल तर ग्राहक त्याच्या दुकानात प्रवेश करणार नाहीत. अथवा वस्तू घेणार नाहीत या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुकानदारांने मास्क वापरला नसेल तर त्याचे दुकान आठ दिवसांसाठी सील करण्यात येत आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम लोकचळवळ व्हावी यासाठी एन.एस.एस., एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. वाढदिवस, श्राध्द अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने दानशुर व्यक्ती पुढे येवून प्रशासनाला मास्क, पीपीई किट, हात मोजे, फेस शिल्ड, सॅनिटायझरची मदत करत आहेत. आरोग्य शिक्षणावर अधिक भर देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.