नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सात जवानांना नौदलाची संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरवताना पकडण्यात आले होते, या घटनेनंतर आता नौदलाकडून एक कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Navy sources: We do understand that this may come at the cost of some discomfort, however the decision is in the larger national Interest. Directives on usage of social media and smart phones for Indian Navy personnel have existed before. https://t.co/yAhB9dd7PK
— ANI (@ANI) December 30, 2019
नौदलाकडून मेसेजिंग ऍप, नेटवर्किंग आणि ब्लॉगिंग, कंटेट शेअरिंग, होस्टिंग, ई-कॉमर्स साईट्सवर देखील बंदीची घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी 20 डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या व हेरगिरी करणारे एक रॅकेट उद्धवस्त करत, यात सहभागी असल्याचे आढळलेल्या नौदलाच्या सात जवानांना अटक केली होती.
आंध्रपदेश पोलिसांच्या गुप्तरच विभागाने केंद्रीय गुप्तचर संस्था व नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने ऑपरेशन डॉल्फिन्स नोज राबवत हे रॅकेट उद्धवस्त केले होते.