टोरंटो – कॅनडाने भारत व पाकिस्तानात कोविड-19 ची वाढती लक्षणे लक्षात घेऊन या देशांतील प्रवासावर 30 दिवसांसाठी बंदी आणली आहे. नुकतीच त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ब्रिटनमध्ये भारतीय व्यक्तीच्या प्रवेशासाठी “रेड लिस्ट नियम’ लागू केला जाईल.
नुकतेच ब्रिटनमध्ये इंडियन व्हेरिएंटचे 55 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्लीहून मायदेशी जाणारे किंवा ब्रिटन किंवा आयर्लंडचे नागरिक दिवस हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन राहतील.
दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, हॉंगकॉंग, फ्रान्सनेही भारताच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अमेरिका, इस्रायलने भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सिंगापूरमध्ये दिवस क्वॉरंटाइन झाल्यानंतर सात दिवसांपर्यंत घरात अनिवार्य रूपाने राहावे लागेल.
भारतातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशास दुबईत प्रवेश नाही. मनाई एप्रिलपासून दिवसापर्यंत असेल. दिवस इतर देशांत काढणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दुबईत प्रवेशाची परवानगी असेल.
सिंगापूरमध्ये भारतातून जाणाऱ्या लोकांना पहिल्यांदा 14 दिवसांसाठी विशेष व्यवस्थेत व नंतर 7 दिवस घरात विलगीकरणात राहावे लागेल. न्यूझीलंड हा विमान प्रवास रोखणारा पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंडचे प्रवासीही 11 ते 28 एप्रिलदरम्यान परत येऊ शकत नाहीत. तर हॉंगकॉंगमध्ये भारतातून येणारी-जाणारी विमान उड्डाणे 3 मेपर्यंत रद्द केली. या महिन्याच्या दोन उड्डाणांदरम्यान 50 बाधित आढळले होते.