काय? बोरिवलीमध्ये चुंबनास बंदी??? चक्क रस्त्यावर लिहिले… “नो किसिंग झोन’

मुंबई – रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांनी एकमेकांना मिठ्या मारुन बसणे आणि सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे युरोपमध्ये सहसाध्य गोष्ट असते. त्यात कोणाला वावगेही वाटत नाही. मुंबईत बॅंडस्टॅंड किंवा हॅंगिंग गार्डन अथवा पुण्यात झेड ब्रिजवरही असे प्रकार नेहमीच चाललेले पाहतो. पण बोरीवलीमधील मॉर्निंग वॉक करणारे नागरिक प्रेमी युगुलांच्या किसींग सीनमुळे हैराण झाले आहेत आणि त्यांनी रस्त्यावर चक्क “नो किसींग झोन’चे फलक लावले आहेत.

तुम्ही आतापर्यंत “नो पार्कींग’ “नो हॉर्न’च्या पाट्या वाचल्या असतील. “सायलेंट झोन’च्या पाट्याही वाचल्या असतील. मात्र, मुंबईच्या बोरवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत. त्या पाट्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. बोरवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र, हे इथं लिहलंय “नो किसिंग झोन.’ या जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येत असतात. त्यांचे किसिंग पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक वैतागले आणि कंटाळले आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरच “नो किसिंग झोन’ असं लिहिलंय.

“जॉगर्स पार्क’चा हा परिसर बोरवलीचा हाय प्रोफाईल परिसर आहे. याच हाय प्रोफाईल जागेमध्ये एक गार्डन बनवलं आहे. या गार्डनमध्ये रोज कपल्स येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात. कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहतात आणि किसिंग करतात. यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती मात्र रोज हे पाहून हैराण झाले. प्रसंगी कारमध्ये किंवा अगदी रिक्षामध्येही किसींगचे असे प्रकार सुरु असल्याचे दिसून आले आहे.

किसिंगचे वाढणारे हे प्रकार लक्षात घेता सोसायटीतल्या लोकांनी आता एक नामी शक्कल लढवली. या किसिंग करणाऱ्या कपल्सला वेसण घालण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावरच “नो किसिंग झोन’ अशी जाहीर सूचना लिहिली. हा मेसेज लिहिल्यानंतर या भागामध्ये कपल्स कमी झालेत आणि किसिंगचे प्रकारही बंद झाल्याचे समजते. मग ही सगळी प्रेमी युगुले गेली तरी कुठे? तर बहुतांश युगुलांनी आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा सहारा घेतल्याचे दिसून आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.