शिर्डी – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे यांची सदिच्छा भेट घेऊन नगर भेटीचे निमंत्रण दिले. दिल्ली येथे भेटीदरम्यान गृहमंत्री शहा यांचा श्री साईबाबांची मूर्ती व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर आधारित “पायोनियर’या ग्रथांची प्रत देऊन सत्कार केला.
माजी केद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना या भेटीत शहा यांनी आवर्जून उजाळा दिला. शहा यांना नगर येथे भेट देण्याची विनंती ना. विखे पाटील यांनी केली. जनसेवा फाउंडेशनच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण शहा यांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.