-->

यापुढे मोबाईल बाॅक्समध्ये मिळणार नाही ‘हेडफोन’ अन् ‘चार्जर’?

मुंबई – मोबाईल फोनचे दर कमी ठेवण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी आता एक नवी युक्ती शोधून काढली आहे. मोबाईल फोनबरोबर मोबाईलचा चार्जर, हेअर फोन आणि इतर उपकरणे दिली जात होती. या उपकरण पुरवठ्याला कात्री लावण्याचे काम मोबाइल कंपन्यांनी सुरू केले आहे.

या बचत मोहिमेची सुरुवात गेल्या वर्षी ऍपल कंपनीने केली होती. त्यावेळी सॅमसंग कंपनीने ऍपल कंपनीच्या या धोरणाची खिल्ली उडवली होती. मात्र आता सॅमसंग कंपनीने ऍपल कंपनीच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरविले आहे. नुकताच सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलक्‍सी एस 21 फोन सादर केला. मात्र हा फोन पाठविला जात असताना पॅकेजमध्ये फक्त फोन असेल परंपरेप्रमाणे यात चार्जर आणि एअरफोन असणार नाही.

मोबाईल फोनबरोबर फक्त युएसबी केबल दिली जाणार आहे. मात्र या केबलचे करायचे काय? तर ग्राहकांना 2,000 रुपये मोजून चार्जर खरेदी करावा लागणार आहे. गेल्या 18 महिन्यापासून बऱ्याच मोबाईल कंपन्यांनी मोबाईलसोबतची उपकरणे कमी करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र या काळात फोनचे दर मात्र वाढत गेले आहेत. उपकरणांसह फोन दिल्यास हे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे ग्राहकांना फोनची किंमत कमी वाटावी यासाठी मोबाईल कंपन्या या युक्‍त्या करीत आहेत.
………..

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.