बंगळुरू – देशभरामध्ये बळावलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. अशातच आज कर्नाटक सरकारने कोरोना विषाणूच्या प्रसारास अटकाव घालण्यासाठी राज्याच्या सीमा सील केल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटक सरकारने आजपासून परराज्यातील खासगी व सार्वजनिक वाहनांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास अटकाव केला आहे. मात्र ही बंदी किती दिवसांसाठी लादण्यात आली आहे याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकला नाही.
कर्नाटक सरकारने परराज्यातील वाहनांना बंदी घातली असली तरी यातून वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती काही अपरिहार्य कारणांसाठी कर्नाटकला प्रवास करत असेल तर अशा व्यक्तीस देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर राज्यात प्रवेश करण्याची मुभा दिली जाईल. असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
Movement of passenger public & private vehicles coming into Karnataka from neighbouring states shall be stopped. This order excludes goods vehicles, passengers moving under unavoidable circumstances and vehicles carrying essential commodities: Karanataka Govt #CoronavirusPandemic
— ANI (@ANI) March 22, 2020