पक्षनिष्ठेविषयी कोणी शंका घेऊ नये – आशा बुचके

जुन्नर – मी गेली अठरा वर्षे शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करत असून गट-तट न करता पक्ष वाढविण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी केले. जुन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, शहरप्रमुख शिवा खत्री, विकी गोसावी, संदीप ताजणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभेच्या पराभवातून खचून न जाता आम्ही आमची लोकसेवेची कामे सुरूच ठेवली असून यापुढे आठवड्यातील तीन दिवस तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या समस्या दूर करणार असल्याचे बुचके यांनी सांगितले. मी बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या आदर्श तत्त्वांवर काम करत असून माझ्या पक्षनिष्ठेविषयी कोणी शंका घेण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या. तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी सत्तास्थानांवर आमचे सहकारी यशस्वीरीत्या काम करत असून भविष्यातही सेनेच्या माध्यमातून काम आणखीन जोरात करणार असल्याचे बुचके यांनी सांगितले. मात्र येत्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नसून त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.