रोहितबरोबर कोणतेही मतभेद नाहीत – कोहली

नवी दिल्ली –  भारतीय क्रिकेट संघ आज वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा बरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे.

मी सुद्धा बातम्यांमधून रोहित सोबत माझे मतभेद झाल्याचे ऐकले आहे. संघाची चांगली कामगिरी होण्यासाठी ड्रेसिंग रुममधले वातावरण खूप महत्वाचे असते. जर माझे आण्इ रोहितचे मतभेद असते तर ड्रेसिंग रुम मधील वातावरण खराब झाले असते आणि आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो असे उत्तर विराटने दिले आहे.

त्याच बरोबर गेल्या चार वर्षांपासून आम्ही भरपूर मेहनत करुन संघाला पहिल्या क्रमांकावर आणले आहे. त्यामुळे अशा वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही. तुम्ही ड्रेसिंगरुममध्ये येऊन बघा तिथे कसे वातावरण असते असे म्हणत विराटने हे वृत्त फेटाळून लावले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.