‘डायट चार्ट’ ना खडतर व्यायाम ! ‘या’ पठ्ठ्याने केवळ बिअर पिऊन घटवलं १८ किलो वजन

नवी दिल्ली – बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वजन वाढलं की सहाजिकच त्यासोबत विविध आजारही बळावतात. त्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी मग डायटेशियनकडे जाऊन डायट प्लॅन घेणे ओघानं आलंच. त्यातही खाण्यापिण्यावर अनेक निर्बंध घातले जातात. त्यात अल्कोहोलचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एका व्यक्तीने केवळ बिअर पिऊन आपलं वजन घटवण्याची किमया करून दाखवली आहे.

अमेरिकेतील सिनसिनाटी शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने हटके पद्धतीने वजन कमी केलं आहे. एक्सआर्मीमॅन असलेल्या डेल हॉल यांनी फक्त बिअर पिऊन 18 किलो वजन घटवलं आहे. हॉल तब्बल 46 दिवस फक्त बिअरवरच राहिले. या कालावधीत त्यांनी दुसरं काहीच खाल्लं नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हॉल ब्रेकफास्ट न घेता दिवसातून दोन ते पाच बिअर प्यायचे. सर्वात पहिली बिअर दुपारी जेवणाच्या वेळी पितो. त्यानंतर भूख लागली तर पुन्हा दुसरी बिअर, असं हॉल यांनी सांगितलं.

दरम्यान आपला रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि शरिरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात असल्याचं हॉल यांनी सांगितलं. तसेच वजन कमी करण्यासाठी आपण केलेले प्रयोग इतरांनी फॉलो करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.