नवी दिल्ली – पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस हे सॉफ्टवेअर वापरले जात असल्याने त्यावर जगभर उठलेल्या गदारोळानंतर ते बनवणाऱ्या एनएसओ या कंपनीवर अमेरिकेत बंदी घालण्यात आल्याबद्दलची कोणतीही आपल्याकडे नसल्याचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
या कंपनीवर बवंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंबर प्रसाद निशाद आणि चौधरी सुखरामसिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
अमेरिकेने पत्रकार, राजनैतिक अधिकारी आणि कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पेगॅसस हे सॉफ्टवेअर बनवल्याबद्दल एनएसओ समुह आणि कॅडीरुवर बंदी घातली आहे का? ब) आणि जर तसे असेल तर त्याचा तपशील क)आपले मंत्रालय एनएसओवर बंदी घालणार आहे का? ड) जर हो असेल, तर त्याचा तपशील इ) जर नसेल तर त्याची कारणे असा हा प्रश्न होता.
या मंत्रालयाकडे अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आणि एनएसओ वर बंदी घालण्याचा कॅणताही प्रस्ताव नसल्याचे या उत्तरात स्पष्ट करण्यात आले.