राजगुरूनगर : ३१ डिसेंबर चे औचित्य साधून राजगुरूनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीन ‘नको दारू नको बियर, हॅपी न्यूव इयर’, “दारू नको दूध प्या” हा अनोखा उपक्रम घेवुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहचविण्यासाठी राजगुरुनगर येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आज ३१ रोजी “चला व्यसनाला दूर करूया”. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंनिसच्यावतीने ‘चला व्यसनाला बदनाम करूया’, ‘हॅपी न्यूव इयर, हॅपी न्यूव इयर- खाणार नाही घुटका पिणार नाही बियर’, ‘नको दारू नको बियर, हॅपी न्यूव इयर’, “अरे अरे भावा खाऊ नको मावा”, असे फलक लावण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.यावेळी अंनिसच्या वतीने दूध वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या ऍड साधना बाजारे यांच्या हस्ते नाकारण्यात आली. यावेळी पर्याय प्रतिष्ठा चे वामन बाजरे, मांदळे विकास वर्धिनीचे नंदकुमार मांदळे, माजी जिप सदस्य पी टी शिंदे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील वाळुंज, नगर सेवक किशोर ओसवाल, रोटरी क्लबचे प्रवीण वायकर आदी उपस्थित होते.