मुंबई – भारताच्या महिला क्रिकेट संघातील एक अव्वल खेळाडू शिखा पांडे हिचा भारतीय वायुदलाकडून खास गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल हा गौरव करण्यात आला असून वायुदलाकडून असा सन्मान मिळविणारी शिखा भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे.
Sqn Ldr Shikha Pandey, a member of Indian Women's Cricket Team, was felicitated by Air Mshl MSG Menon, Air Officer-in-Charge Administration, for her outstanding performance in the ICC T20 World Cup held at Australia this year. #IndianAirForce pic.twitter.com/scJMRoJM7I
— Indian Air Force (@IAF_MCC) March 14, 2020
पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर शिखाने हा मान मिळविला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्यासाठी अत्यंत संकटांचा सामना करून आज हे यश मिळविणारी शिखा देशातील अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा बनली आहे, असे व्यक्त करत वायुदलाने तिच्या सत्काराचा क्षण कॅमेरात बंदिस्त केला व सोशल मीडियावर पोस्ट केला. चाहत्यांनी या पोस्टला लाईक करत शिखाचे अभिनंदन केले आहे.