मुंबई – मुंबईच्या वरळी भागात नायट्रोजन टॅंकचा आज सकाळी स्फोट होऊन तेथील इमारतीचा काहीं भाग कोसळल्याचा प्रकार घडला आहे.
सकाळी नऊ च्या सुमाराला वरळीतील सेंच्युरी इमारतीत हा प्रकार घडला. तेथील नायट्रोजन टॅंकची क्षमता 250 लिटर लिक्वीड नायट्रोजनची होती.
त्या टाकीचा आज अचानक स्फोट झाला. पण स्फोटाचे नेमके कारण मात्र अजून समजू शकले नाही. या घटनेत एक तीस वर्षीय महिला जखमी झाली आहे. अन्य जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम हाती घेतले आहे. तथापि त्या ढिगाऱ्या खाली कोणी अडकल्याची माहिती नाही.