पटना ( nitish kumar tejaswi yadav to meet PM ) – देशामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी आता जोर धरत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( nitish kumar ) देखील जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात असून येत्या सोमवारी ते याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. विशेष म्हणजे यावेळी बिहार विधानसभेचे विरोधीपक्ष नेते तेजस्वी प्रसाद यादव ( tejaswi yadav ) हे देखील त्यांच्या समवेत असणार आहेत.
बिहार येथे भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. अशातच सोमवारी बिहार येथील १० पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, जातनिहाय जनगणनेच्या ( OBC caste census ) मागणीच्या निमित्ताने नितीश कुमार ( nitish kumar ) व तेजस्वी यादव ( tejaswi yadav ) बऱ्याच कालावधीनंतर एकत्र येणार आहेत.
OBC RESERVATION | “शरद पवारांना चांगलं माहिती आहे की…’ – फडणवीसांचे विधान
बिहारमध्ये भाजप ( BJP ) वगळता सर्व पक्षांनी ओबीसी जातनिहाय आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. याबाबत जनता दलाच्या नेत्याने प्रतिक्रिया देताना, “बिहार विधानसभेत मांडण्यात आलेल्या ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या ठरावाला सर्वच पक्षांनी सदनामध्ये पाठिंबा दिला होता. मात्र भाजपने आता या विषयावर माघार घेतली आहे.” असं सांगितलं.
बिहार भाजपमधील काही नेते ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आहेत. यामध्ये बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी ( Renu Devi ) यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या ( OBC caste census ) मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे झालेले एकमत भाजपसाठी जेडीयू ( JDU ) व राजद ( RJD ) भविष्यात एकत्र येऊ शकतात असा इशारा आहे का? असा प्रश्न विचारला असता, “नितीश कुमार यांनी यापूर्वीच जेडीयू एनडीएचा घटक पक्ष असल्याचं जाहीर केलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र आले ही चांगली बाब आहे. मात्र यातून आताच काही राजकीय अर्थ काढणं घाईचे ठरेल.” असं वक्तव्य एका जेडीयू नेत्याने केलं.