नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री

पटना – बिहारमध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आज नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मुख्यमंत्रीपदाची सातवी शपथ ठरली आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू यादव उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. यातच  माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

“नितीश कुमारांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिल्याबाबत अभिनंदन”

 


काय म्हणाले यशवंत सिन्हा

“नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल” असं म्हटलं आहे.  भाजपाला सर्वाधिक जागा आल्याने त्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनावे, असे आपल्याला वाटत असल्याचे नितीश कुमार यांचे म्हणणे होते.” बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो असं देखील सिन्हा यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.