Political News : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन नवीन यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सोमवारी बिहार विधानसभेच्या सदस्यपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवीन यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांच्याकडे सुपूर्द केला, जो तातडीने स्वीकारण्यात आला आहे. Political News १६ मार्च रोजी नितीन नवीन आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) बिनविरोध निवड झाली होती. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दोघांनीही आपापल्या पूर्वीच्या सभागृहांच्या सदस्यत्वाचा त्याग केला. राजीनामा दिल्यानंतर नितीन नवीन यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. Political News Political News : भाजप आमदाराचा राजीनामा; केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी? गेल्या २० वर्षांपासून माझे वडील दिवंगत नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी निष्ठेने उभारलेल्या बांकीपूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले.जनतेने मला सलग पाच वेळा निवडून देऊन सेवा करण्याची संधी दिली, हा माझा बहुमान असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. पक्षाने सोपवलेली नवी जबाबदारी पार पाडतानाही बिहार आणि बांकीपूरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. नवीन यांच्या राजीनाम्यामुळे आता बांकीपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.Political News