मुंबई – महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सत्तास्थापनेचा पेच काही केल्या सुटत नव्हता, मात्र आज अखेर तो प्रश्न सुटला आहे. आज राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना शपथ दिली. हा शपथविधीचा सोहळा राजभवनात पार पडला.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजप आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचो वातावरण पसरल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 23, 2019
गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलय की “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे”, अस म्हणत त्यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या.