सोलापुर विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना आली भोवळ

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे. राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली त्यामुळे ते खाली बसले परंतु, लगेच त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रगीत संपल्यानंतर लगेच खाली बसले. त्यानंतर त्यांना पेय देण्यात आले. यावेळी मंचावर असणाऱ्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले.

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमासाठी केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते. सकाळी बाराच्या सुमारास त्याचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले आगमनानंतर भाजप पदाधिकाजयांचा सत्कार स्वीकारून ते सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमास्थळी पोहोचले कार्यक्रमावेळी सुरू असलेल्या राष्ट्रगीतावेळी त्यांना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना ते तसेच उभे राहिले राष्ट्रगीत संपल्यानंतर ते खुर्चीवर खाली बसले त्यानंतर त्यांना पेय देण्यात आले. दरम्यान, आता त्यांची प्रकृति स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यापुर्वीदेखील गडकरींना राहुरी विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमात अशीच भोवळ आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.