नितीन गडकरींकडून रोहित पवारांची ‘ती’ मागणी मान्य; 399 कोटी रुपये मंजूर

कर्जत – आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्याची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली आहे. या महामार्गासाठी 399.33 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासंदर्भात रोहित पवार यांनी माहिती दिलीय.

“काही दिवसांपूर्वी आपली भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. याचा मान ठेवून आपण भरीव निधी मंजूर केलात, याबाबत माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने साहेब आपले मनापासून आभार! या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल!” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

आढळगाव ते जामखेड हा 62.77 कीमीचा रस्ता आहे. या मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार असून हे काम 18 महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रस्ता प्रवासी वाहतूकीसह कारखानदारी वाहतूकीसाठीही महत्वाचा ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.