लोकसभा2019 : महाराष्ट्रातील ‘हे’ दिग्गज नेते सोमवारी उमेदवारी अर्ज करणार दाखल

मुंबई – महाराष्ट्रात 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात सात जांगासाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या मतदारसंघाचा समावेश आहे. याठिकाणी अनेक दिग्गज हे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 25 मार्च (सोमवार) हा अखेरचा दिवस आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), काँग्रेसचे माणिकराव ठाकरे (यवतमाळ) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे दिग्गज नेते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नितीन गडकरी यांना नाना पाटोले यांच्याविरूध्द लढावं लागणार आहे. तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्या विरूध्दात शिवसेनेच्या भावना गवळी निवडणूकीच्या मैदानात असणार आहेत.

प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून निवडणूक लढविणार आहेत. तिथे 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. तेही सोमवारी अर्ज भरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.