Nitin Gadkari on Shivaji maharaj statue collapse । सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्य्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली. एकीकडे विरोधी पक्ष सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल करत असताना आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजींच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कधीच कोसळला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत टनेलिंग इंडिया कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, “मला आठवते, मी मुंबई 55 उड्डाणपूल बांधत असताना एका व्यक्तीने मला मूर्ख बनवले होते. त्या व्यक्तीने मला लोखंडावर पाउंडसह हिरव्या रंगाचा लेप दिला आणि तो गंजणार नाही असे सांगितले. मी त्याच्यावर विश्वास ठेवून लोखंडाचा वापर केला, पण आता त्या लोखंडाला गंज चढत आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.
स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता Nitin Gadkari on Shivaji maharaj statue collapse ।
ते पुढे म्हणाले की, “सध्या समुद्राजवळील 30 किलोमीटर परिसरात पूल बांधण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच कोसळला नसता”. मुंबईत समुद्राजवळच्या सर्व इमारतींना पटकन गंज चढतो. त्यामुळे कोणती गोष्ट कुठे वापरायची आणि कोणती लावायची. मला असे वाटते की ज्याठिकाणी कठोर खडक आहे त्याठिकाणी ड्रिलिंगसाठी कमी शक्तिशाली मशीन आवश्यक असेल. आणि जिथे माती आहे तिथे जड यंत्रांची गरज नाही. अशा मशीन्सचे दोन प्रकार आहेत का? राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतानाही स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजले Nitin Gadkari on Shivaji maharaj statue collapse ।
भारतीय नौदलामार्फत राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. हा पुतळा जयदीप आपटे या शिल्पकाराने उभारला होता. या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सार्वजनिक विभागाने नौदल विभागाला कळवले होते. परंतु, नौदलाकडून त्यानंतर कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. शिवाजी महाराजांचा हा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र, आठ महिन्यांमध्ये हा पुतळा पडल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
जयदीप आपटेविरोधात लूकआऊट नोटीस जारी
दरम्यान, या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी चेतन पाटील यांना पोलिसांना अटक केली आहे. मात्र, जयदीप आपटे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी पाच पथके तैनात केली असून त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.