मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा शनिवारी झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मास्टर सभा म्हणे..
ही तर नस्तर सभा..
महाराष्ट्र ला लागलेल नस्तर!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 14, 2022
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’मास्टर सभा म्हणे.. ही तर नस्तर सभा.. महाराष्ट्र ला लागलेल नस्तर!!’ असं म्हणत राणे यांनी शिवसेनेवर घणाघात केलं आहे.
ते पुढे म्हणाले,’शिवसेनेच्या सभेत ना मुख्यमंत्री ना पक्षप्रमुख दिसले. घाबरलेला बिथरलेला आजारी माणूस दिसले. कालच्या भाषणानं मला त्यांची दया येत आहे. मी त्यांच्या डॉक्टरांना विनंती करतो. औषधांचा डोस कमी करावा. आजारी माणसाला इतका त्रास कुटुंब का देतंय? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला आहे.