बारामती (प्रतिनिधी) –बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदी नीता संजय बारवकर तर उपसभापतिपदी प्रदीप तुकाराम धापटे यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली.
बारामती पंचायत समितीच्या सभापति व उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या. पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मावळते सभापती संजय भोसले, मावळत्या उपसभापती शारदा खराडे, विजय शिंदे, वनिता बनकर तुषार कोकरे तसेच सर्व पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती नीता बारवकर व उपसभापती प्रदीप आवटे यांचा सत्कार करण्यात आला.