#NisargaCyclone : मुंबईत ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणार वारे

मुंबई – अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा परावर्तीत होऊन निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन जवळ समद्रात आले आहे. हे वादळ मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. वादळ धडकल्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रतितास १०० ते १२० किलोमीटर वेगाने सोसाटयाचे वारे वाहील. भारतीय हवामान विभागाचे डीजीएम मृत्यूंजय मोहापात्रा यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार,  हे वादळ तीन जून रोजी संध्याकाळी मुंबई महाराष्ट्रसह गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. या वादळामुळे हानी होऊ नये म्हणून राज्य व केंद्र सरकारने आत्तापासून पुर्वतयारी सुरू केली आहे. एनडीआरएफच्या दहा तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. मुबंई पालघर, ठाणे, रत्नागिरी रायगड या ठिकाणी प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.