टाकळी हाजी- निर्वी (ता. शिरूर) येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अमृता घोडे हिने फाईटमध्ये सुवर्णपदक तर सार्थक घोडे, प्रितम घोडे, दानिश गायकवाड, ज्ञानेश्वरी औटी यांनी कास्यपदक मिळविले. कता नावाचा प्रकार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट करीत कौतुकास्पद कामगिरी केली.
कता प्रकारात अमृता घोडे, सार्थक घोडे,प्रितम घोडे, ज्ञानेश्वरी औटी, सनिका निचित, आर्यन निचित, ज्ञानेश्वरी चोरे, दानिश गायकवाड, आर्या साळवे, पुष्कर घोडे, आयान पठाण यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.मुलांची कसरत व शिस्त पाहून शाळेला द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. विजेत्या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक शेख यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, प्राचार्य साईनाथ कानडे, ग्रामस्थ, शिक्षक यांनी अभिनंदन केले.