Nirmala Sitharaman । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला दरडोई उत्पन्न $2730 गाठण्यासाठी 75 वर्षे लागली. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार, पुढील ५ वर्षांत दरडोई उत्पन्नात $2000 ची वाढ होईल.” असे म्हटले आहे. त्यांनी पुढे बोलताना,”येत्या काही दशकांत सामान्य माणसाच्या जीवनशैलीत मोठा बदल होणार आहे जो भारतीयांच्या जीवनाची नव्याने व्याख्या करेल. असमानता कमी करून हे यश मिळवले जात असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.
दरडोई उत्पन्नात जोरदार वाढ शक्य Nirmala Sitharaman ।
कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाले, गेल्या दशकात आर्थिक आघाडीवर भारताची उत्कृष्ट कामगिरी, 5 वर्षात जगातील 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप, सातत्याने उच्च विकास दर आणि महागाई कमी ठेवल्यामुळे हे शक्य झाले आहे” असे त्या म्हणाल्या. तसेच अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”भारताचे दरडोई उत्पन्न $2730 गाठण्यासाठी 75 वर्षे लागली आहेत, परंतु पुढील 5 वर्षांत त्यात आणखी $2000 जोडले जाऊ शकतात. ” जेव्हा संपूर्ण जग विभागले गेले आहे आणि सतत संघर्ष होताना दिसत आहे, जो जागतिक शांततेसाठी मोठा धोका आहे, असे असतानाही, भारताच्या 140 कोटी लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्न, जे एकूण 18 टक्के आहे. जगाची लोकसंख्या येत्या काही वर्षांत दुप्पट व्हायची आहे.” असे वक्तव्य त्यांनी केले.
भारतासमोर अनेक आव्हाने Nirmala Sitharaman ।
अर्थमंत्री पुढे म्हणाल्या कि, “2000 च्या दशकात, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण त्यांच्या अनुकूल असल्यामुळे चीनसारख्या उदयोन्मुख बाजारपेठा सहजतेने वेगाने वाढू शकल्या. पण भारतासाठी हे मोठे आव्हान असले तरी ते एक संधीही घेऊन येते.”तसेच त्या म्हणाल्या कि,”जागतिक परिस्थिती पूर्वीसारखी नाही, तरीही पुढील दशकात भारताचा वेगाने विकास होत राहील.”
उपभोगात वाढ होईल
निर्मला सीतारामन म्हणाल्या, येत्या दशकात भारतात खपामध्ये जोरदार वाढ होईल. सध्या, 43 टक्के भारतीय 24 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि त्यांना त्यांच्या उपभोगाच्या पद्धतींचा शोध घेणे बाकी आहे.
हेही वाचा
दुर्गापूजा सुरु असतानाच माजी भाजप खासदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला! पश्चिम बंगालमधील घटनेने खळबळ
भारतीय शेअर बाजाराला थोडा दिलासा ; इराण-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी