निर्मलावर चार वर्षांची बंदी

मोनॅको: मैदानी स्पर्धेतील उत्तेजक सेवनासंदर्भात आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने भारताची धावपटू निर्मला शोरॉं हिच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. शरीरात उत्तेजक सापडल्यामुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली असून तिला मिळालेली दोन आशियाई पदकेही बाद करण्यात आली आहेत.

बंदी घालण्यात आलेले ड्रोस्टॅनोलोन आणि मेटेनोलोन हे उत्तेजक तिच्या शरीरात सापडले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या स्पर्धेत तिच्या करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत ही उत्तेजके सापडली.

त्यामुळे तिच्यावरील बंदी 28 जून 2018 पासून सुरू झाल्याचे समितीने सांगितले आहे. तिची ऑगस्ट 2016 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीतील कामगिरीही बाद ठरविण्यात आली आहे.

2017च्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकले होते. ही पदके तिच्याकडून काढून घेण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.