नवी दिल्ली – भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले. मृत्यूसमई त्या ८५ वर्षाच्या होत्या. मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. करोनासह अन्य् आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मिल्खा सिंग व त्यांच्या पत्नी निर्मल सिंग यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मिल्का सिंग यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nirmal Kaur, former captain of Women's volleyball team & wife of former athlete Milkha Singh passed away due to COVID19 in a private hospital at Mohali
"We are deeply saddened to inform you that Nirmal Milkha Singh passed away after a valiant battle against COVID," says family
— ANI (@ANI) June 13, 2021
निर्मल सिंग यांचे रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. आम्हाला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, कोरोनाविरोधातील लढाईत निर्मल मिल्खा सिंग यांचे निधन झाले. अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
निर्मल सिंग या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारही होत्या. यासह त्यांनी पंजाब सरकारमध्ये क्रीडा संचालक (महिलांसाठी) या पदावरही काम सांभाळले होते.
निर्मल सिंग यांना २६ मे रोजी मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर मिल्खा सिंग यांना पीजीआयच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे.