#Nirbhayacase: मुकेशसिंग यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेशसिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम  कोर्ट मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता सुनावणी करणार आहे. आरोपी मुकेशसिंग यांची घ्या  याचिका राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी फेटाळली. मुकेश सिंग यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले मुकेश सिंग, विनय शर्मा, अक्षय सिंह आणि पवन गुप्ता यांना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.

यापूर्वी या चारही आरोपीना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती, परंतु मुकेशसिंग यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दखल केल्यामुळे त्याच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता राष्ट्र्पतींनी दया याचिका फेटाळल्यामुळे त्यांना 1 फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात येईल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.