निर्भया प्रकरणातील आरोपींची पुन्हा कोर्टात धाव

नवी दिल्ली – तिहार कारागृहातील अधिकारी आमच्या अशिलांना त्यांनी मागितलेली कागदपत्रे देण्यास तयार नाहीत असा दावा करीत या प्रकरणातील दोन आरोपींच्या वकिलांनी आज पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यावर उद्या शनिवारी सुनावणी होणार आहे.

अक्षयकुमार सिंह आणि पवनसिंह यांच्यावतीने ही याचिका सादर करण्यात आली आहे. आम्हाला क्‍युरेटिव्ही पीटीशन दाखल करायची आहे. त्यासाठी आमच्या अशिलांना जी कागदपत्रे हवी आहेत ती कागदपत्रे देण्यास तुरूंग अधिकारी टाळाटाळ करीत आहेत असा दावा त्यांनी या याचिकेत केला आहे.

या प्रकरणातील अन्य दोन आरोपी विनयकुमार शर्मा आणि मुकेशसिंग यांच्या क्‍युरेटिव्ही पिटीशन सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. या चारही आरोपींना येत्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर ही फाशी टाळण्यासाठीच्या क्‍लुप्त्या आरोपींकडून वापरल्या जात आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here