नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने दोषींचे डेथ वॉरंट जारी केले. या चारही दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येईल. फिर्यादींनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
2012 Delhi gangrape case:A Delhi court issues death warrant against all 4 convicts. pic.twitter.com/w1x1hNihZM
— ANI (@ANI) January 7, 2020
दिल्ली सरकारने निर्भया प्रकरणातील चार आरोपीना फाशी देण्यासाठी ‘डेथ वॉरंट’ देण्याची विनंती केली होती. दिल्ली सरकारच्या याचिकेवर कोर्टाने आज सुनावणी केली. पटियाला हाऊस कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. त्यांच्या डेथ वॉरंटवर आज कोर्टाने सुनावणी केली. सुनावणी दरम्यान निर्भयाची आई आणि दोषी मुकेशची आई न्यायालयात रडली.