#niraj chopda : नीरजच्या बायोपिकमध्ये झळकणार खिलाडी कुमार?

भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकत ऐतिहासीक कामगिरी केली. यानंतर प्रत्येकजण सोशल मीडियावर नीरजचा विजय साजरा करत आहे. 

पण या दरम्यान अक्षय कुमारचे नाव देखील अचानक ट्रेंडींगला आले आहे. दरम्यान काही ट्‌विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात अक्षय कुमारने नीरजच्या बायोपिकचे हक्‍क विकत घेतल्याचे सांगण्यात आले.

“बायोपिकची तयारी सुरू’ असे म्हणत नेटकऱ्यांनी अक्षयचा एका चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. ज्यानंतर अक्षय हा नीरज चोप्रावर आधारित बायोपिक करत असल्याच्या चर्चांना आणखीनंच उधाण आले. या फोटोत अक्षयच्या हातात भाला दिसून येत आहे.

यानंतर, अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत. ज्यात असे म्हटले जात आहे की अक्षय आता नीरजचा बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे. नीरज किंवा अक्षय कुमार या दोघांनीही अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. याबाबत फक्त फॅन्स सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.

अक्षय वास्तविक जीवनातील कथांवर आधारित चित्रपट बनवतो आणि विशेषतः जे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. याच कारणामुळे नीरजच्या बायोपिकसाठीही चाहत्यांनी अक्षयचे नाव घ्यायला सुरुवात केली. सध्या अक्षय त्याच्या आगामी “बेल बॉटम’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.