#व्हिडिओ : नीरामाई दुसऱ्यांदा ‘ओव्हरफ्लो’

वाघळवाडी – वीर धरण परिसरात वरुण राजाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने वीर धरणामधून ५४ हजार ४७४ क्युसेक वेगाने नीरा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. याबाबत वीर धरण व्यवस्थापनाने कळवले असून सकाळी सहा वाजल्यापासून हे पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान या पाण्याने निरा नदी दुतर्फा भरून वाहत आहे, तरी नीरा नदी काठावरील जुने बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, नदीकाठच्या सर्वांनी काळजी घेणे नीरा नदी पात्रात कुणी जाऊ नये,असा सतर्कतेचा इशारा सर्वांना देण्यात आला आहे .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.